Dharashiv News : 'लोडशेडिंग नाही' म्हणताच आ. कैलास पाटील बरसले file photo
धाराशिव

Dharashiv News : 'लोडशेडिंग नाही' म्हणताच आ. कैलास पाटील बरसले

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे शनिवारी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.

पुढारी वृत्तसेवा

A meeting was held in Nanded on Saturday under the chairmanship of Agriculture Minister Dattatray Bharne to review the drought situation

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे शनिवारी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतीसाठी होणाऱ्या वीजकपातीचा मुद्दा उपस्थित करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

बैठकीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना पाटील यांनी, "इमर्जन्सी लोडशेडिंग कशासाठी करता?" असा सवाल केला. त्यावर लोडशेडिंग होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी "कधी कधी इमर्जन्सी लोडशेडिंग होते," असे स्पष्ट केल्यानंतर पाटील यांनी, "कधी कधी नाही, रोजच लोडशेडिंग आहे," असे सांगत विशेषतः संध्याकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, महावितरणचे संचालक धनंजय औंडेकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. राज्यात लोडशेडिंग नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत, "लोडशेडिंग आहे. खोटे बोलणे चुकीचे आहे.

रोज संध्याकाळी इमर्जन्सी लोडशेडिंग केली जाते," असे सुनावले. वीज कमी पडत असेल तर वीज विकत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना दिल्या.

तसेच यापुढे लोडशेडिंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांनीही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT