भूममध्ये पार पडली जंगी इफ्तार पार्टी file photo
धाराशिव

भूममध्ये पार पडली जंगी इफ्तार पार्टी

शहरातील गांधी चौक येथील मर्कज मस्जिद समोर विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वर्षांची परंपरा जपत यावर्षीही जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

A grand Iftar party was held in Bhum.

भूम, पुढारी वृत्तसेवा शहरातील गांधी चौक येथील मर्कज मस्जिद समोर विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वर्षांची परंपरा जपत यावर्षीही जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. कोरोना काळातील खंड वगळता हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवत प्रतिष्ठानने समाजात एकतेचा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश दिला आहे.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, युवानेते साहिल गाढवे तसेच गटनेते सुरज गाढवे यांच्या हस्ते शहरातील मान्यवर हाजी बांधवांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगराध्यक्ष शाकेर शेख, वस्ताद मामू जमादार, नगरसेवक बबलू बागवान, बाळासाहेब अंधारे, आसिफ जमादार, वस्ताद अख्तर जमादार, मोहम्मद चाऊस, रामभाऊ बागडे, मुशीर शेख, जाकीर शेख यांच्यासह आलमप्रभू शहर विकास आघाडीचे सचिव तथा नगरपरिषदेचे गटनेते सुरज गाढवे आणि अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

या इफ्तार सोहळ्याच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव, परस्पर आदर आणि सामाजिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण निर्माण झाले. समाजातील विविध घटक एकत्र येऊन बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य सातत्याने घडत असून युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासही या उपक्रमाची मोठी मदत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT