मराठवाडा

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर प्रकरणात लव जिहादवर बंदीची मागणी; उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा

backup backup

वसमत (हिंगोली); पुढारी वृत्‍तसेवा : दिल्ली येथे लव जिहाद प्रकरणातून हत्या झालेली तरुणी श्रद्धा हिला आपला जीव गमावावा लागला. या घटनेचा निषेध करत वसमत येथे विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी महिला विभागाच्यावतीने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले. यातून आंतरधर्मीय विवाह व लवजिहादवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. (Shraddha Murder Case)

दिल्ली येथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिष देवून तरुणीची हत्या केल्याची घटना घडली. लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धाने लग्नाची मागणी केल्यानंतर तिच्या शरीराचे क्रूर पद्धतीने ३५ तुकडे केले. त्यानंतर आरोपीने हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते. सहा महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला असून या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. श्रध्दा सारख्या हजारो निष्पाप मुली अशा लव जिहाद प्रकरणात अडकून चिरडल्या जात आहेत. (Shraddha Murder Case)

आतापर्यंत हजारो हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यांच्याबरोबर बळजबरीने लग्न करून त्यांचा छळ केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा नराधमांना कायद्याची भीती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे कायदे कडक करावेत, आंतरधर्मीय विवाह आणि लव जिहादवर तात्काळ बंदी घालावी. अशी मागणी विश्व हिंदू परिषद ,दुर्गा वाहिनी महिला विभाग वसमत यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या संघटनांच्या वतीने मोर्चा काढत देशाच्या राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर अरुणा तोरेवार, गोदावरी पटवे, सुषमा बोड्डेवार,रेखा मनेवार, कल्पना चामलवार, विजयालक्ष्मी खपले, सुनिता पारवे, लता तोष्णीवाल, शोभा उदावंत, रूपाली वैजवाडे, इंदुबाई सुपेकर, जयश्री लक्कमवार, सावित्री वाघमारे, निकिता गुडेवार ,स्वरूपा गुडेवार, मीरा दिंडुरकर ,अंजली महाराज, गीतांजली बोल्लेवार, मुक्ता बोललेवार ,जयश्री महाजन, राजश्री मेहेत्रे, शारदा कोमलवार, ममता ताटेवार, कविता बोखारे,अरुणा वडीपल्ली ,अर्चना तमखाने ,ज्योती बोखारे ,रेखा पातुरकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT