सोनपेठ,पुढारी वृत्तसेवा : सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दशरथ सुर्यवंशी आणि उपसभापतीपदी उत्तम जाधव यांची आज (दि.२२) बिनविरोध निवड झाली. सभापती व उपसभापती निवडीसाठी नूतन संचालकाची विशेष सभा झाली. या सभेत या दोन्ही पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी नुतन सभापती व उपसभापती यांचे स्वागत केले.
नुकत्याच पार पडलेल्या सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर नेत्तृत्वाखाली शेतकरी विकास पॕनलने एक हाती सर्वाच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवला होता. तर विरोधी आघाडीचे आमदार वरपुडकर व आमदार दुर्राणी यांच्या पॕनलला मोठा पराभव स्वीकारावा लागला. सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या १० वर्षापासून राजेश विटेकर यांची एक हाती सत्ता असून आज पार पडलेल्या शेतकरी विकास पॅनलच्या विशेष सभेत नूतन सभापतीपदी आणि उपसभापदींची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी बोलावलेली सभा शांततेत पार पडली.
हेही वाचलंत का ?