मराठवाडा

रात्रीच्यावेळी गोगलगायीकडून पिकं फस्त; शेतकऱ्याने काढले धक्कादायक व्हिडिओ

अमृता चौगुले

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्‍तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी झाली आहे. आता सोयाबीनचे पीक जोमदार आले होते. मात्र रात्री औरंगाबाद तालुक्यातील रामवाडी या शिवारातील सोयबिन पिकावर गोगलगायींनी विळखा घातला आहे.

शेबी गोगलगायींकडून पिक फस्‍त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोगलगायी रात्रीतून पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन पिवळे पडत आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी पिके जळू लागली आहे. त्‍यामूळे शेतकऱ्यांपुढे मोठ संकट निर्माण झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 .हेही वाचा 

SCROLL FOR NEXT