छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत युवा सेनेच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. युवासेनेचे मराठवाडा सचिव नीलेश शिंदे यांच्या नेतृत्वात शनिवारी (दि.२) टिव्ही सेंटर येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून शनिवारी युवा सेनेच्या वतीने चव्हाण यांचा जाहिर निषेध करुन पुतळा दहन करण्यात आला. चव्हाण यांनी हिंदू धर्माची माफी मागावी, अशी घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख शिवाजी भगुरे, उपजिल्हाप्रमुख अर्जुन रेड्डी, दत्ता वखरे, सौरभ गुंजाळ, अक्षय पोलकर, शहर प्रमुख पप्पु इंगळे, तालुकाप्रमुख अनिल जाधव, प्रविण हातकंगने, विजय गायकवाड, जिल्हा समन्वय भारत भुगे, स्वप्नील भांगे, जिल्हा सचिव अजय तळणकर, चेतन खुर्दे, अमोल धनवटे, उपशहर प्रमुख सनी साळवे, सुरेश जाधव, अक्षय कोकाटे, प्रज्वल ढवळे, यश गायकवाड, प्रसाद निकम, कृष्णा सोनवणे, नोमेश बकले, विशाल गायके, दिपक पवार, कॉलेज कक्ष प्रमुख निखील काकडे आदी युवासेनाचे पदाधिकारी उपस्थित होते.