युवक महोत्सव : वेळापत्रक जाहीर, यजमान महाविद्यालयेही निश्चित File Photo
छत्रपती संभाजीनगर

युवक महोत्सव : वेळापत्रक जाहीर, यजमान महाविद्यालयेही निश्चित

कुलगुरु डॉ. फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ; १ ते १२ सप्टेंबरदरम्यान आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Youth Festival: Schedule announced, host colleges also finalized

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे आयोजन १ ते १२ सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. चारही महाविद्यालयांचे यजमान संघही निश्चित झाले असून, महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

युवक महोत्सवसंदर्भात यजमान महाविद्यालयाची निवड करण्यासाठी बैठक कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.४) पार पडली. या बैठकीत चारही जिल्ह्यांत आठ महाविद्यालयांचे प्राचार्य, सांस्कृतिक विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत चर्चा होऊन जिल्हानिहाय महोत्सवासाठी महाविद्यालय व तारीख निश्चित करण्यात आली.

चार जिल्ह्यांतील पारितोषिक विजेते प्रथम तीन संघांना केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होता येणार आहे. केंद्रीय युवक महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये ५ ते ७ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

महाविद्यालय व महोत्सवाच्या तारखा

धाराशिव शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब १ व २ सप्टेंबर

बीड - पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा - ४ व ५ सप्टेंबर

जालना लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय व स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा - ७ व ८ सप्टेंबर

छत्रपती संभाजीनगर शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय - ११ व १२ सप्टेंबर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT