योगेश सोळुंके pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Crime: पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत तरुणाने घेतली फाशी

चिकलठाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, जीवन संपवण्यामागचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पत्नीशी व्हिडिओ कॉलवर संवाद सुरू असतानाच ३४ वर्षीय ठेकेदार तरुणाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८) सायंकाळी बीड बायपास परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. योगेश नारायणराव सोळुंके (रा. अरुणोदय कॉलनी, मूळ जालना) असे मृताचे नाव आहे. ते शासकीय इलेक्ट्रिशन ठेकेदार होते. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे.

योगेश शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बीड बायपासवरील हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. संवाद सुरू असतानाच त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या नजरेस ही बाब येताच त्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.

माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला तत्काळ उपचारासाठी मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योगेशला तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, जीवन संपवण्यामागचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT