Honeytrap : डेटिंगॲपद्वारे तरुणाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Honeytrap : डेटिंगॲपद्वारे तरुणाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवले

लॉजवरील व्हिडिओ काढून १ लाख उकळले; पुन्हा ५ लाखांची मागणी; महिलेसह युट्युबरवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Young man trapped in 'honeytrap' through dating app

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवर १ रुपयात एक दिवसासाठी डेटिंग अशी भुरळ पाडणारी जाहिरात पाहून चॅटिंग करणे एका २५ वर्षीय भाजीपाला विक्रेत्या तरुणाला चांगलेच महागात पडले. महिलेने आरोपी आमीन शेख साथीदारासोबत मिळून त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले.

लॉजमध्ये नेऊन नकळत अश्लील व्हिडिओ काढले. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागून १ लाख रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता एका युट्यूबरला सोबत घेऊन पुन्हा ५ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख आमीन शेख बिलाल (वय २४, रा. मुजीब कॉलनी, रोशनगेट) आणि एक महिला (वय ४०), आफताब फिल्म्स या युट्यूब चॅनलचा मालक तकी हसन खान अशी आरोपींची नावे आहेत. आमीन आणि महिलेला अटक करण्यात आली.

न्यायालयाने दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनवाल्याची महिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी रविवारी (दि.१८) दिली.

आगे का पिक्चर अभी बाकी है..; १० लाखांची खंडणी

या घटनेनंतर ५ सप्टेंबर रोजी तरुणाच्या व्हॉट्सअॅपवर आमीन शेख याने शांग्रीला लॉजमधील त्याचे अश्लील फोटो पाठवले आणि कॉल करून आगे का पिक्चर अभी बाकी है, क्या करने का बोलो अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरुणाने हा प्रकार चुलत भावाला सांगितला. त्याने मध्यस्थी करून ८ सप्टेंबर रोजी रात्री जिन्सी चौकात आरोपींना चर्चेसाठी बोलावले. तेथे आमीन शेख, संबंधित महिला आणि त्यांचे दोन साथीदार आले. लॉजमधील शारीरिक संबंधांचा संपूर्ण व्हिडिओ दाखवून १० लाखाची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरलची धमकी दिली. तरुणाने त्या वेळी १ लाख रुपये रोख देऊन हे प्रकरण मिटवले. त्यावेळी केलेल्या कबुलीनाम्यात ४० वर्षीय महिलेने तिचे खरे नाव सांगितले.

युट्यूबरचा फोन अन् पुन्हा ५ लाखांची मागणी

१ लाख रुपये उकळल्यानंतरही या खंडणीखोरांची हाव मिटली नाही. १५ ऑक्टोबर रोजी आफताब फिल्म्स या युट्यूब चॅनलचा चालक तकी हसन याने तरुणाच्या काकाला फोन केला. तुमच्या पुतण्याचा व्हिडिओ माझ्याकडे आला असून ती महिलाही माझ्याकडे आली आहे, त्यांना अजून पैसे हवे आहेत, असे सांगत त्याने मजनू हिल गार्डन येथे बोलावून घेतले. तेथे आमीन शेख, महिला आणि युट्युबर तकी हसन आले. तिघांनी पुन्हा ५ लाखाची खंडणी मागितली. त्यावेळी काकांनी चला, आपण जिन्सी ठाण्यातच बसून बोलू, असे ठणकावून सांगताच तकी हसन मोबाईल बंद करून पसार झाला. त्यानंतर तरुणाने पुराव्यांसह पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT