मराठा आरक्षणाच्या नैराश्येतून तरूणाने जीवन संपविले  
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या नैराश्येतून तरूणाने संपविली जीवनयात्रा

पुढारी वृत्तसेवा

पैठण : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून नारायणगाव येथील तरूणाने रविवारी (दि.१५) आपली जीवनयात्रा संपविली. शिवनाथ नारायण बर्डे (वय २८) असे या तरूणाचे नाव आहे. आंदोलन करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवित आहे, अशी या तरूणाने जीवन संपविण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील नारायणगाव येथील शिवनाथ तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वत : ची जीवयात्रा संपविली. मराठा समाजाने आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे, अशी चिठ्ठी त्याने जीवनयात्रा संपविण्यापूर्वी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT