Sambhajinagar Murder : मजूर तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खून  (File photo)
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Murder : मजूर तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खून

गेवराई तांडा भागातील घटना; खानावळीतील आरोपी कामगाराला अटक

पुढारी वृत्तसेवा

Young laborer stabbed to death in the chest

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा खानावळीवर गेलेल्या : तरुणाला तेथील कामगाराने छोटा चाकू थेट छातीत खुपसल्याने हृदयात घाव लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कमरेतही भोसकण्यात आले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २८) रात्री दहाच्या सुमारास गेवराई तांडा येथील सचिन वाणी यांच्या खंडेवाडी रोडवरील हॉटेल-खानावळ येथे घडली.

दीपक दत्ता कांबळे (२२, रा. पैठणखेडा, ता. पैठण, ह. मु. गेवराई तांडा) असे मृताचे नाव असून, आरोपी रवींद्र सुभाष बोर्डे (२३, रा. शेंद्रा कमगर) याला उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी शुक्रवारी दिली.

नातेवाईक व पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मृत दीपक हा मजुरी काम करायचा. तो आई-वडील व कुटुंबासह गेवराई तांडा येथील शिवकृपा कॉलनीत राहत होता. दरम्यान, खंडेवाडी रोडवर असलेल्या सचिन वाणी यांच्या हॉटेल खानावळीवर तो नेहमी जात होता. तो दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने तेथील कामगार आरोपी बोर्डेसोबत त्याची चांगलीच मैत्री झाली होती.

ते दोघे नेहमीसोबत असायचे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी रात्रीही दोघे खानावळीवर असताना त्यांच्यात काही तरी कारणावरून वाद झाला. त्यातून बोर्डे याने पॉकेट साईजच्या चाकूने थेट दीपकच्या छातीत खुपसला. तो घाव थेट हृदयात शिरल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा वार कमरेत केला.

त्याला जखमी अवस्थेत रुग्णलयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दरवडे, उपनिरीक्षक नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत बोर्डेला ताब्यात घेतले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी पूजा नागरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, दीपक घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

श्वानाने शोधला चाकू

बोर्डेने दीपकचा खून केलेला चाकू खानावळीच्या बाजूलाच गवतात फेकून दिला होता. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने गवतात फेकलेला चाकू शोधून दिला. त्यानंतर ठसेतज्ज्ञांमार्फत त्यावरील पुरावे गोळे केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी बोर्डेवर यापूर्वी चिकलठाणा पोलिस ठाण्यात विवाहितेचा छळ व बँकेशीसंबंधित असे दोन गुन्हे नोंद आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT