जिल्ह्यातील शाळांमध्ये खेळासाठी आता दररोज एक तास : जिल्हाधिकारी

राष्ट्रीय क्रीडा दिन सोहळ्यात केले जाहीर : विद्यार्थ्यांना दिला खेळण्याचा मंत्र
sambhajinagar school news
जिल्ह्यातील शाळांमध्ये खेळासाठी आता दररोज एक तास : जिल्हाधिकारी File Photo
Published on
Updated on

Now one hour every day for sports in schools in the district: District Collector

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शाळांमध्ये दररोज एक तास खेळासाठी हा उपक्रम सुरू करीत असल्याचे शुक्रवारी (दि. २९) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहीर केले असून, खेळल्याने शारीरिक मानसिक स्वास्थ्य सुधारते. खिलाडू वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे मुलांनो भरपूर खेळा, पण मैदानावर, मोबाईलवर नव्हे, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना खेळण्याचा मंत्र दिला.

sambhajinagar school news
Buddhist Caves and Ganesha : बौद्ध लेण्या असूनही गणपती विराजमान

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक प्राचार्य यांना प्रोत्साहनपर अनुदान धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू अनिता चव्हाण, डॉ. केदार रहाणे, उद्धव टकले, शशिकांत वडाप तसेच मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्राचार्य खेळाडू आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

sambhajinagar school news
गुजरातहून ट्रॅव्हल्सव्दारे आले नशेच्या औषधीचे पार्सल; बससह १२७० बाटल्या जप्त

यावेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, हल्ली मोबाईलच्या वापरामुळे मैदाने ओस पडली आहेत. मुले खेळतात, पण ते मोबाईल मधील गेम असतात. हे अपेक्षित नाही. मैदानावर खेळ खेळल्याने आपले शारीरिक स्वास्थ्य सुदृढ होते. मानसिक स्वास्थ्य सुधारते. शालेय जीवनातील हे क्रीडाविषयक अनुभव पुढे आयुष्यातील विविध प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कामात येतात. असे ते म्हणाले. क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी दररोज एक तास खेळासाठी हा उपक्रम जिल्ह्यात सुरू करीत असल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी जाहीर केले. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी प्रास्ताविक तर उपसंचालक शेखर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दोन दिवस उपक्रम

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने याच उपक्रमांचा भाग म्हणून आज शनिवारी (दि.३०) सकाळी साडेदहा वाजता देवगिरी महाविद्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे व्याख्यान होणार आहे. तर रविवारी (दि.३१) सकाळी साडेआठ वाजता विभागीय क्रीडासंकुल येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news