Sambhajinagar News : जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात

सकल आदिवासी समाजाच्या वतीने रविवारी (दि.९) शहरात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

World Tribal Pride Day Celebrated with Enthusiasm

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सकल आदिवासी समाजाच्या वतीने रविवारी (दि.९) शहरात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांती चौकात क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर दुपारी क्रांती चौकातून वाहनरॅली काढण्यात आली. पैठणगेटमार्गे ही रॅली औरंगपुरा येथे पोहोचली. तेथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नारळीबागमार्गे रॅली आमखास मैदानावर पोहोचली. आमखास मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी गौरव दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला.

आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत विविध उपक्रमांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी तसेच रॅलीने शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT