राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनच्या एका क्लिकवर त्वचा उजळवण्याचे, पिंपल्स एका रात्रीत गायब करण्याचे किंवा चेहऱ्यावरील डाग कायमचे घालवण्याचा दावा करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. मात्र रील्स पाहून स्वतःच्या चेहऱ्यावर, त्वचेवर प्रयोग करणे अनेकांना महागात पडत आहे. अशा रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, केवळ चुकीच्या सल्ल्यामुळे अनेकांच्या निरोगी त्वचेचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी ८ जुलै हा दिवस जागतिक त्वचा आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. यंदा या दिनाचे घोषवाक्य बेटर नॉलेज, बेटर स्किन हेल्थ (योग्य माहिती असेल तर) त्वचा अधिक निरोगी राहू शकते. असे आहे. याबाबत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत स्किनकेअर हा आरोग्याचा कमी आणि फॅशनचा विषय अधिक झाला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक आठवड्याला नवीन ट्रेंड येतो.
कधी बर्फाने चेहरा चोळण्याचा, तर कधी लिंबू, बेकिंग सोडा किंवा टूथपेस्ट चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो. गंभीर म्हणजे, अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता स्टेरॉइडयुक्त क्रीम्स वापरतात किंवा मित्रांनी सुचवलेली औषधे स्वतःहून वापरतात. यामुळे त्वचारोगतज्ज्ञांकडे चेहरा लाल होणे, त्वचेवर जळजळ होणे, पिग्मेंटेशन वाढणे, त्वचा अतिसंवेदनशील होणे, कायमचे डाग पडणे, स्टेरॉइडमुळे त्वचा पातळ होणे, बुरशीजन्य संसर्ग वाढणे अशा अनेक समस्या घेऊन येणारे रुग्ण वाढत आहेत.
आज सोशल मीडियावर त्वचेविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. मात्र प्रत्येक माहिती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असेलच असे नाही. त्वचेची समस्या लपवू नका किंवा इंटरनेटवरील सल्ल्यावर उपचार करू नका. योग्यवेळी सल्ला घेतल्यास अनेक त्वचारोग सुरुवातीलाच नियंत्रित करता येतात. योग्य ज्ञान हीच निरोगी त्वचेची पहिली पायरी आहे.- डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ
स्टेरॉइडयुक्त क्रीम्सने धोका
काही क्रीम्सच्या वापरामुळे सुरुवातीला त्वचा तेक त्वचा आरोग्य | असे आहे. याबाबत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत स्किनकेअर हा आरोग्याचा कमी आणि फॅशनचा विषय अधिक झाला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक आठवड्याला नवीन ट्रेंड येतो. कधी बर्फाने चेहरा चोळण्याचा, तर उजळल्यासारखी वाटते आणि पिंपल्स कमी झाल्याचा भास होतो. मात्र नंतर दुष्परिणाम समोर येतात. त्वचा इतकी नाजूक होते की उन्हात * जाणेही कठीण होते आणि नंतर यावर उपचार करणे डॉक्टरांसाठीही गुंतागुंतीचे ठरते.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्यांना उपयोगी पडलेले उपचार आज सोशल मीडियावर त्वचेविषयी माहिती सहज उपलब्ध आहे. मात्र प्रत्येक माहिती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असेलच असे नाही. त्वचेची समस्या लपवू नका किंवा इंटरनेटवरील सल्ल्यावर उपचार करू नका. योग्यवेळी सल्ला घेतल्यास अनेक त्वचारोग सुरुवातीलाच नियंत्रित करता येतात. योग्य ज्ञान हीच निरोगी त्वचेची पहिली पायरी आहे. - डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ. किंवा उत्पादने आपल्यालाही तितकीच सुरक्षित असतील असे नाही. त्वचेची काळजी ही ट्रेंडनुसार नव्हे, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावी. योग्य माहिती, उपचार त्वचेच्या दीर्घकालीन आरोग्याचे रहस्य आहे.- डॉ. असावरी टाकळकर, त्वचारोगतज्ज्ञ