Election Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paid Leave for Voting : कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी

उपआयुक्तांकडून कंपनी, आस्थापनांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Workers should be given paid leave to vote Deputy Commissioner appeals to companies and establishments

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.७) मतदान होणार आहे. तरी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे आवाहन कामगार उपआयुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे.

मतदानासाठीची ही सुटी उद्योग, - ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. (उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देण्याबाबत संबंधित आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदानाकरिता सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल. तरी कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुटी देण्यात यावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त पाटणकर यांनी केले आहे.

यासंदर्भात होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार उप आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला असून, संबंधित कामगार, कामगार संघटनांनी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT