पुढारी इफेक्ट : चारणेर ओढ्यावरील पुलाच्या कामाला सुरुवात file photo
छत्रपती संभाजीनगर

पुढारी इफेक्ट : चारणेर ओढ्यावरील पुलाच्या कामाला सुरुवात

सिल्लोड-घाटनांद्रा राज्यमार्ग क्रमांक ४४ वरील चारणेर गावाज-वळील ओढ्यावर नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली.

पुढारी वृत्तसेवा

Work Begins on the Bridge over the Charner Stream

घाटनांद्रा, पुढारी वृत्तसेवा :

सिल्लोड-घाटनांद्रा राज्यमार्ग क्रमांक ४४ वरील चारणेर गावाज-वळील ओढ्यावर नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. यामागे दैनिक पुढारीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामास सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

घाटनांद्रा येथून सिल्लोडकडे जाण्यासाठी हा राज्यमार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, चारणेर गावाज-वळील ओढा हा दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक ठरत होता. मागील वर्षी आलेल्या मुसळधार पावसामुळे या ओढ्याला पूर येऊन तब्बल पाच तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी, रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते.

या गंभीर समस्येकडे दैनिक पुढारीने वेळोवेळी वृत्तांतातून लक्ष वेधले. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कामाला हिरवा कंदील दिला असून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला आहे.

मात्र, सध्या सुरू झालेले हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, पुन्हा एकदा पावसाळ्यात वाहतुकीची कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः शिक्षणासाठी सिल्लोडकडे जाणारे विद्यार्थी, तसेच रुग्णांना दवाखान्यात नेणारी वाहने यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे संबंधित ठेकेदाराने कामाचा वेग वाढवून पावसाळ्याअ- ाधीच पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

या पुलाच्या प्रश्नावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल दैनिक पुढारीचे आभार. आता काम सुरू झाले असले तरी ते वेळेत पूर्ण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. -
रवीभाऊ राजपूत, सरपंच, चारणेर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT