Cannabis Smuggling : नारेगावच्या बलूच गल्लीत महिलांकडून गांजा तस्करी (File photo)
छत्रपती संभाजीनगर

Cannabis Smuggling : नारेगावच्या बलूच गल्लीत महिलांकडून गांजा तस्करी

एनडीपीएसच्या छाप्यात ५ किलो गांजा जप्त; एका महिलेला अटक, दुसरी पसार

पुढारी वृत्तसेवा

Women smuggling cannabis in Naregaon's Baloch Galli

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असतानाच, नारेगाव भागातील बलूच गल्लीत घरासमोरच गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) पथकाने मंगळवारी (दि.१४) छापा मारला. या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून, दुसरी पसार झाली आहे. कारवाईत ५ किलो १७६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

भारती आणि बबिता नामचीकर अशी या गांजा तस्करी करणाऱ्या आरोपी महिलांची नावे आहेत. यापैकी भारती (४०, रा. बलूच गल्ली नं. ९, नारेगाव) हिला अटक करण्यात आली असून, तिच्या ताब्यातून ३ किलो ५९६ ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि एक वजन काटा जप्त करण्यात आला आहे. तर, पोलिसांच्या छापेमारीची कुणकुण लागताच बबिता ही बाजूलाच असलेली तिची पत्र्याची टपरी सोडून पसार झाली. पोलिसांनी त्या टपरीची झडती घेतली असता तिथेही १ किलो ५८० ग्रॅम वजनाचा ७९ हजार रुपयांचा गांजा मिळून आला. या दोन्ही महिलांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी 'एनडीपीएस' पथक स्थापन करून शहर नशामुक्त करण्याची मोहीम उघडली. मध्यंतरी शहरात मोठ्या प्रमाणात कारवाया करत अनेक टोळ्या गजाआड झाल्या, तर काही पेडलर्स भूमिगत झाले. मात्र, बलूच गल्ली क्रमांक ९ आणि भाटनगर परिसरात अमली पदार्थ तस्करीने पुन्हा डोके वर काढल्याची माहिती मिळताच एनडीपीएसचे सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे आणि उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे यांच्या पथकाने हा छापा मारून गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आणला.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रविकांत गच्चे, वर्षा काळे, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, हवालदार भाऊसिंग चव्हाण, नारायण पायघन, अंमलदार सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, विठ्ठल पवार यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT