Mangalsutra Snatched : सिडको वाळूज महानगरात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mangalsutra Snatched : सिडको वाळूज महानगरात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले.

पुढारी वृत्तसेवा

Woman's Mangalsutra Snatched in CIDCO Waluj Mahanagar

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १०) रात्री सिडको वाळूज महानगरातील वाळूज हॉस्पिटलजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्राजक्ता उदसिंग राजपूत (३२, रा. सिडको वाळूज महानगर-१) आणि त्यांची जाऊ शीतल परदेशी या मंगळवारी रात्री भाजीपाला घेण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेल्या होत्या. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास या दोघी मोपेडवरून (एमएच २०, ईए-६५१३) घरी परतत होत्या.

वाळूज हॉस्पिटलजवळ पोहोचताच, त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून दोन भामटे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने प्राजक्ता राजपूत यांच्या गळ्यातील ११.१३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले.

यावेळी राजपूत यांनी मदतीसाठी आरडाअ-ओरड केली, मात्र नागरिक मदतीला येईपर्यंत दोन्ही भामटे दुचाकीवरून अहिल्यानगर महामार्गाच्या दिशेने सुसाट पसार झाले. याप्रकरणी प्राजक्ता राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT