Sambhajinagar News : चिमुकल्यासह रेल्वेखाली उडी घेणाऱ्या महिलेची ओळख पटली file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : चिमुकल्यासह रेल्वेखाली उडी घेणाऱ्या महिलेची ओळख पटली

दीड महिन्यापूर्वीच झाले होते पतीचे निधन

पुढारी वृत्तसेवा

Woman who jumped under a train with her little child identified

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अवघ्या दीड महिन्यापूर्वी पतीचे निधन झाल्याच्या धक्क्यातून तपोवन सावरू न शकलेल्या एका विवाहितेने, आपल्या चार वर्षीय चिमुकल्यासह एक्स्प्रेससमोर उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात घडली. शनिवारी (दि. ६) दुपारी घडलेल्या या घटनेतील अज्ञात मृत महिलेची आणि मुलाची ओळख पटविण्यात पुंडलिकनगर पोलिसांना यश आले आहे.

पल्लवी अक्षय बनकर (२६) आणि त्यांचा मुलगा दक्ष अक्षय बनकर (वय २ वर्ष, दोघे रा. शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी) अशी दोघा मृत माय-लेकरांची नावे आहेत. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात या महिलेने मुलासह धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली होती.

घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, मृतांकडे कोणतीही ओळख पटवणारी वस्तू नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शनिवारी दुपारपासून पोलिसांची पथके या महिलेची ओळख पटवण्याचे काम करत होती. अखेर, रविवारी दुपारनंतर पल्लवी यांच्या नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली.

मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पल्लवी आणि दक्ष यांची ओळख निश्चित केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश मुंडे यांनी दिली. या घटनेमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा तपास पुंडलिकनगर पोलिस करत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. ८) दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आईकडेच राहायला आल्या होत्या पल्लवी

पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी यांच्या पतीचे दीड महिन्यापूर्वीच निधन झाले होते. या अनपेक्षित आघातामुळे त्या खचल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्या मुकुंदवाडी येथेच त्यांच्या आईकडे राहण्यासाठी आल्या होत्या. पतीच्या जाण्याचे दुःख आणि नैराश्य असह्य झाल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT