गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने महिलेचा मृत्यू file photo
छत्रपती संभाजीनगर

गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील घटना; पोलिस ठाण्यात नोंद

पुढारी वृत्तसेवा

Woman dies after taking abortion pills

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने एका अठ्ठावीस वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील घाटनांद्रा येथे सोमवारी (दि. २३) पहाटे घडली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आयशा समीर मुल्ला (२८, रा. घाटनांद्रा) असे मृत महिलेचे नाव असून तिने तेरा दिवसांपूर्वी गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या होत्या. मृत महिलेने १० फेब्रुव ारीच्या दरम्यान गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या होत्या. यानंतर त्रास सुरू झाल्याने नातेवाईकांनी सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

येथे आठ- दहा दिवस उपचार घेतले. मात्र या उपचारदरम्यान प्रकृती चिंताजनक झाली. यामुळे पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने अति रक्तस्त्राव झाला व त्यात महिलेने जीव गमावल्याचे कळते.

या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लहू घोडे करीत आहेत. दरम्यान महिलेचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीचे दोन, तर दुसऱ्या पतीचे दोन असे चार मुलं मृत महिलेच्या पश्चात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेच्या अकाली मृत्यूमुळे चारही मुलांचे मातृछत्र हरपले.

गर्भपाताच्या गोळ्या दिल्या कुणी ?

गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने अति रक्तस्त्राव झाला व त्यात महिलेचा मृत्यू झाला. मात्र गर्भपाताच्या गोळ्या दिल्या कुणी ? असा प्रश्न निर्माण होत आहे. गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या की, मेडिकलवरून स्वतः खरेदी केल्या, हे समोर येणे गरजेचे आहे. तालुक्यात यापूर्वी गर्भपात, गर्भलिंगनिदान चाचणीचे प्रकार समोर आलेले आहे. तर ओळ-खीतून काही मेडिकलमधून अशा प्रकारच्या औषधी, गोळ्यांची विक्री केली जाते, हे सदर घटनेवरून सिद्ध होते. पोलिसांनी योग्य मार्गाने तपास केला, तर मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर घटनेची माहिती घेऊ. पोलिस तपासात कुणी अशा प्रकारच्या गोळ्या, ओषधी विक्री करणाऱ्याचे नाव समोर येतो का, हे आता महत्वाचे आहे. असे असले तरी अशा प्रकारच्या गोळ्या, ओषधी विक्री करणाऱ्यांचा आम्ही आमच्या स्तरावर शोध घेऊ. शिवाय अन्न व ओषध भेसळ विभागालाही चौकशीसाठी पत्र देऊ.
डॉ. नासेर पठाण, तालुका आरोग्य अधिकारी, सिल्लोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT