Wheat Price : पैठण येथील बाजार समितीत गव्हाला मिळाला चांगला दर file photo
छत्रपती संभाजीनगर

Wheat Price : पैठण येथील बाजार समितीत गव्हाला मिळाला चांगला दर

भुसार मालाच्या खुल्या लिलावाचा आमदार भुमरेंच्या हस्ते शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

Wheat fetched a good price at the Paithan market committee

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भुसार धान्याच्या खुल्या लिलाव बाजाराचा शुभारंभशुक्रवारी (दि.७) आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दरम्यान, पहिल्याच लिलावात गव्हाला उल्लेखनीय दर प्राप्त झाला. पूर्वी २,२०० ते २,४०० प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा गहू आज २,६०० ते २,७५० प्रतिक्विंटल या दराने विक्री झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांना लक्षणीय आर्थिक लाभ झाला.

आमदार भुमरे म्हणाले की, पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीने काळानुरूप बदल करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विविध सुविधा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून, या ठिकाणी योग्य दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती मोठ्या प्रमाणवर दिसत आहे.

जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, उपसभापती राम पाटील येरंडे, संचालक बद्रीनाथ बोंबले विठ्ठल काका दोरखे, सचिन मोगल, शरद नरके, सुभाष मुळे, राजेंद्र पाटील तांबे, परसराम हजारे, राजू टेकाळेंसह सचिव नितीन विखे यांची उपस्थिती होती.

आमदार भुमरे यांनी हा उपक्रम शेतकरी हिताचा तसेच पारदर्शक असल्याचे नमूद केले. उपसभापती राम पाटील येरंडे यांनी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीतच विक्रीस आणावा, असे आवाहन केले. खुल्या लिलावामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात आवक वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT