Ellora Caves : हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील पाहुण्यांची वेरूळ लेणींना पसंती

जपानसह इतर प्रतिनिधींची जागतिक वारसा स्थळाला भेट
Ellora Caves
Ellora Caves : हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील पाहुण्यांची वेरूळ लेणींना पसंतीfile photo
Published on
Updated on

Guests from the hospitality sector show a preference for the Ellora Caves

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पर्यटन आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील ३९ पाहुण्यांनी शुक्रवारी (दि.७) जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणींना भेट देत येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वैभवाचे सौंदर्य डोळ्यात साठवून माहिती घेतली. या प्रतिनिधी मंडळात जपानमधील चार पाहुण्यांचाही समावेश होता.

Ellora Caves
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या आठ दरवाजांतून विसर्ग

वेरूळ लेणीतील अप्रतिम शिल्पकला, विशेषतः कैलास लेण्याची भव्य रचना, प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचे वैभव आणि ऐतिहासिक वारसा पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. लेणींच्या इतिहासासह त्यामागील सांस्कृतिक परंपरेची सखोल माहिती त्यांनी जाणून घेतली. पर्यटन क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींच्या या भेटीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटन क्षमतेची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा ओळख निर्माण होण्यास मदत होणार आहे. विशेषतः जपानसारख्या देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे वेरूळ लेणी आणि परिसरातील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे-

Ellora Caves
Health Department : आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया रद्द

आज अजिंठा लेणीला भेट

दरम्यान, हे प्रतिनिधी मंडळ शनिवारी (दि.८) अजिंठा लेणीला भेट देणार असून, तेथील लेण्याचे सौंदर्य त्याचा इतिहास व परिसरातील व्यवसायाची माहिती जाणून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रतिनिधी मंडळामुळे नवीन हॉटेल्स आणि फ्लॅट संस्कृतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news