Water supply notification : आता पाणीपुरवठ्याची सूचना मिळणार १२ तास आधी file photo
छत्रपती संभाजीनगर

Water supply notification : आता पाणीपुरवठ्याची सूचना मिळणार १२ तास आधी

जल बेल अॅपमध्ये नवे बदल : गळतीच्या तक्रारींपासून दुरुस्तीच्या छायाचित्रांपर्यंत माहिती

पुढारी वृत्तसेवा

Water supply notifications will now be provided 12 hours in advance.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना पाणी कधी येणार, याची माहिती किमान १२ तास आधी मिळावी, यासाठी महापालिकेने जल बेल अॅपमध्ये बदल केले आहेत. त्याचबरोबर जलवाहिनी गळतीची तक्रार नोंदविणे, तिच्यावर झालेली कार्यवाही पाहणे आणि दुरुस्तीची छायाचित्रे बघण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. स्वयंचलित दिनदर्शिकमुळे मागील पाणीपुरवठ्याच्या नोंदी आणि आगामी पाणीपुरवठ्याच्या संभाव्य तारखाही नागरिकांना पाहता येणार आहेत.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी पाणीपुरवठा विभागाला आवश्यक सूचना दिल्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागरिकांना किमान १२ तास आधी पाणीपुरवठ्याची माहिती देण्यासाठी जलबेल अॅपमध्ये बदल करण्यात आले आहेत.

विभागातील सर्व अभियंत्यांना पाणी येण्याच्या वेळा आणि वेळापत्रकाची माहिती नियमितपणे अॅपवर नोंदविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत माहिती मिळण्यासोबतच अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित जल बेल एक पाऊल आधुनिक युगाकडे होणार आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत नागरिकांनी सुमारे २५ ठिकाणच्या जलवाहिनी गळतीची माहिती दिली. त्यापैकी १५ ठिकाणची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.

गळतीची ठिकाणे वेळेत निदर्शनास आणून देण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. तसेच शहरात कुठेही जलवाहिनीतून पाणी गळत असल्याचे दिसल्यास नागरिक जल बेलवर तक्रार नोंदवू शकतात. गळतीचे ठिकाण आणि त्याबाबतची माहिती भरून तक्रार पाठविता येते.

त्यानंतर संबंधित अभियंते तक्रारीवर काय कार्यवाही करीत आहेत, याची माहिती नागरिकांना पाहता येते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर त्याची छायाचित्रेही अनुप्रयोगावर टाकली जातात. त्यामुळे तक्रार केल्यानंतर तिचे पुढे काय झाले आणि दुरुस्ती झाली की नाही, हे नागरिकांना समजू शकणार आहे.

दररोज १५ हजार नागरिकांकडून वापर

जल बेल अॅप आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये घेतले आहे. दररोज १५ हजारांपेक्षा अधिक नागरिक या अॅपचा वापर करतात. शहरातील दोनशेहून अधिक ठिकाणच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती दररोज त्यावर नोंदविली जाते. आतापर्यंत या माध्यमातून अडीच लाखांहून अधिक सूचना नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT