Water supply from new main water pipeline from October
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार येत्या आऑक्टोबरअखेरपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासोबतच शहरवासियांना या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करणार आहे. त्यामुळे पावसात जॅकवेलचे काम सुरू आहे की, बंद हे पाहण्यासाठी शनिवारी (दि. २६) भर पावसात प्रशासक जी. श्रीकांत यांनी जायकवाडी धरणात जाऊन कामाची पाहणी केली.
शहरवासियांना तातडीने नवीन पाणीपुरवठा योजन-`तून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी खंडपीठासोबतच आता मुख्यमंत्री फडणवीस हे देखील सतत पाठपुरवठा करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीच्या कामावर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आऑक्टोबर अखेरपासून शहरवासियांना मुबलक पाणी देण्याचे आश्वासन दिले आहेत.
त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून देखील या कामाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. यंदाची डेडलाईन हुकणार नाही, यासाठी सतत जॅकवेलचे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठीच शनिवारी भर पावसात जॅकवेलच्या कामासोबतच ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी आवश्यक असलेला फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची देखील प्रशासकांनी पाहणी केली. तसेच हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश एमजेपीच्या अधिकाऱ्यांना दिले.