Water released from Nathsagar Dam for Kharif season
पैठण, पुढारी वृत्तसेवा जुलै महिन्यात नाशिकसह नाथसागर धरणाच्या वरील भागातून पैठण येथील धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक जमा होऊन धरणामध्ये बुधवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७७.१७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.
सध्या पाण्याची आवक ४ हजार ३११ क्युसेक सुरू असल्याने पाणी वाटप नियोजन समितीच्या धोरणानुसार सन २०२५-२६ खरीप हंगामासाठी येथील नाथसागर धरणाच्या उजवा व डावा कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी घेतला आहे.
सायंकाळी शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खरडकर यांनी या दोन्ही कालव्यांतून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील शेतीसाठी वरदान असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी अहिल्यानगर या जिल्ह्यांतील दोन लाख चाळीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्याची शेती सिंचन होणार असून, यामुळे चालू हंगामातील खरीप हंगामासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.