Harsul Lake : हर्सूल तलावाची पाणी पातळी १९ फुटांवर, सलगचा पाऊस ठरला लाभदायक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Harsul Lake : हर्सूल तलावाची पाणी पातळी १९ फुटांवर, सलगचा पाऊस ठरला लाभदायक

आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

Water level of Harsul Lake at 19 feet, continuous rains proved beneficial

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराच्या ११ वॉडाँना हसूल तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण होत आले तरी अद्याप तलावात पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे जलसाठा १८ हून १९ फुटांवर आला आहे. आठ दिवसांत १ फुटाने पाणी पातळी वाढली आहे.

पावसाळा सुरू होऊनही दोन महिने संपत आले आहेत. मात्र अद्यापही शहरात दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही. गतवर्षी जुलैमध्ये काही प्रकाणात पावसाची हजेरी लागल्याने तलावाची पाणी पातळी २ फुटांची वाढ झाली होती.

मात्र हर्सल तलाव शंभर टक्के भरण्यास चार महिन्यांचा अवधी लागला होता. गतवषपिक्षा यंदा हर्मूल तलावातील जलसाठा सुस्थितीत आहे. परंतु या तलावावर अवलंबून असलेल्या ११ वॉर्डातील नागरिकांची तहान वर्षभर भागवण्यासाठी किमान पाणीपातळी २७ ते २८ फुटांवर असणे आवश्यक आहे.

सध्या, या तलावातून शहरातील ११ वॉर्डासाठी दररोज ८ एमएलडी पाण्याचा उपसा केला जात आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार केल्यानंतर तलावातून पाण्याचा उपसाही वाढविला आहे. पूर्वी केवळ ६ एमएलडीच पाणी उपसा केला जात होता. दरम्यान, हर्मूल तलावाची पाणी साठवण क्षमता २८ फूट आहे. त्यामुळे ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी ९ फूट पाण्याची आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT