Water level in Jayakwadi at 94%
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी धरणात वरील भागातून येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळी सहा वाजेदरम्यान धरणाची पाणी पातळी १५२०.८१ फूट पर्यंत पोहोचली. जिवंत पाणीसाठा २०२९.५४५ दलघमी उपलब्ध झाल्यामुळे पाण्याची टक्केवारी ९३.४९ नोंद धरण नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
जायकवाडी धरणाची १८ दरवाजातून गोदावरी नदीत मंगळवारी रोजी सायंकाळी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने बुधवारी रोजी दिवसभर पाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करून थेट धरण सुरक्षा प्रतिबंधित क्षेत्रात सेल्फी काढण्यासाठी चढावढ करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने अधीक्षक अभियंता राजेंद्र दापटकर यांनी धरण नियंत्रण अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेतली. नदीत सोडलेले पाणी शेतीमध् जाऊन नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यासाट कार्यकारी अभियंता गणेश हसे, धरण अभियंता श्रद्ध निंबाळकर यांनी धरण परिसरात विशेष सुरक्षा ठेवण्यात यावी नदी काठावरील गावांतील गोदावरी परिसरात विशेष कर्मचान पथकाकडून गस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे-
जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक झपाट्याने वाढ असल्यामुळे १८ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आलेले आहेत येणारी आवक लक्षात घेता गोदावरीतून सोडलेल्या पाण्याच्य विसर्ग कमी जास्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या दगडी पुलावरून पाणी वाहन असल्याने जुने कावसान, दक्षिण जायकवाडी, खुले कारागृ येथे जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाच रहदारीसाठी वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीन करण्यात आलेले आहे.