मुख्य जलवाहिनी चाचणीचे पाणी पोहोचले फारोळ्यापर्यंत file photo
छत्रपती संभाजीनगर

मुख्य जलवाहिनी चाचणीचे पाणी पोहोचले फारोळ्यापर्यंत

२८ किमी पल्ला यशस्वी : नक्षत्रवाडीपर्यंत १२ किमी अंतर बाकी

पुढारी वृत्तसेवा

Water from the main pipeline test has reached Farola.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या चाचणीत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, रविवारी (दि.५) पाणी थेट फारोळा येथील जलश-द्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यात यश आले. आतापर्यंत २८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून, नक्षत्रवाडी पंपगृहापर्यंत केवळ १२ किलोमीटर अंतर शिल्लक असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली.

सुरुवातीच्या टप्प्यात काही अडथळे येऊनही मागील दहा दिवसांत सहा दिवसांच्या प्रभावी कामातून पाणी सुमारे १९.५० किमीपर्यंत पोहोचवण्यात आले. कौडगाव परिसरातील स्क्रोल व्हॉल्व्हच्या कामामुळे चाचणी काही काळ थांबवावी लागली होती. हे काम पूर्ण होताच पुन्हा पंपिंग सुरू करण्यात आले.

रविवारी कोणतीही मोठी अडचण न येता जलवाहिनीतून पाणी पुढे सरकत सायंकाळपर्यंत आणखी ९.१६ किमी अंतर पार करत फारोळा येथे पोहोचले. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी दाखल होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

या टप्प्यात जलवाहिनीतील साचलेली घाणही बाहेर पडल्याने प्रणाली अधिक एआय इमेज सक्षम झाल्याचे दिसून आले. यानंतर पुढील प्रवासात काही तांत्रिक बाबींची नोंद घेऊन खवरद ारीचा उपाय म्हणून संध्याकाळी पंपिंग थांबविण्यात आले. आवश्यक दुरुस्ती करून पुढील टप्प्यासाठी जलवाहिनी तयार करण्यात येत आहे.

सायंकाळी दोन्ही पंप बंद मुख्य जलवाहिनीच्या चाचणीदरम्यान इन्स् पेक्शन चेंबरमध्ये गॅस किट न टाकल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती झाली. त्यामुळे रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता दोन्ही पंप बंद करून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी ८.३० वाजता पंपिंग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुढील टप्पा महत्त्वाचा

जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंतच्या जलवाहिनीत उंचीतील मोठा फरक पार करावा लागणार आहे. आतापर्यंत पाण्याने सुमारे ६० मीटर उंची गाठली असून, उर्वरित प्रवासात आणखी ७६ मीटर उंची पार करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील टप्पा तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. दाब व्यवस्थापन सुरळीत राहिल्यास १४ एप्रिलपूर्वी नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT