Chhatrapati Sambhajinagar Waluj Robbery  file photo
छत्रपती संभाजीनगर

Robbery | छत्रपती संभाजीनगर हादरलं! उद्योजकाच्या घरावर कोट्यवधींचा दरोडा; ८ किलो सोनं, ४० किलो चांदी लंपास

Chhatrapati Sambhajinagar Waluj Robbery | वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Waluj Robbery |

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दरोड्यात तब्बल ८ किलो सोनं आणि ४० किलो चांदी असा कोट्यवधींचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

लड्डा कुटुंब अमेरिकेत गेल्याचा गैरफायदा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.

८ किलो सोनं आणि ४० किलो चांदी लंपास

दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने व चांदी चोरून नेले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ८ किलो सोने आणि ४० किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT