Chhatrapati Sambhajinagar Accident | जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लग्नाला जाताना दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू

बाळापूर गावानजिक अपघात
Woman Dies In Bike Accident
संगीता पांडे(Pudhari Photo)
Published on
Updated on

Woman Dies In Bike Accident

पिंपळदरी: पिंपळदरी येथील संगीता सुभाष पांडे (वय ४०) ही महिला पिंपळदरी येथून लग्नासाठी अजिंठा गावाकडे जात होती. यावेळी तिने बाळापूर येथील फाट्यावर अज्ञात दुचाकीस्वाराला हात देऊन थांबविले. दरम्यान, जळगाव - संभाजीनगर महामार्गावरील बाळापूर गावाजवळ या महिलेचा दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. घटनेनंतर दुचारीस्वार पसार झाला. ही घटना आज (दि.२६) सकाळी ८.३० वाजता घडली.

दरम्यान, या सर्व घटनेचा तपशील हॉटेल प्रेम सागर वरील सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. परंतु, फुटेजमध्ये गाडीचा नंबर व चालकाचा चेहरा व्यवस्थित दिसत नसल्याने ओळख पटू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला अजिंठा येथील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून महिलेला मृत घोषित केले. महिलेच्या पश्चात मुलगी, मुलगा, पती, सासू , सासरा असा परिवार आहे.

या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिलीप तडवी, रवींद्र बागुलकर करीत आहे.

Woman Dies In Bike Accident
छत्रपती संभाजीनगर : महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news