Student Congress : मत चोरी : विद्यार्थी काँग्रेसकडून रेल्वे रोकोचा प्रयत्न  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Student Congress : मत चोरी : विद्यार्थी काँग्रेसकडून रेल्वे रोकोचा प्रयत्न

यावेळी नगरसोल - नरसापूर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला

पुढारी वृत्तसेवा

Vote theft: Student Congress attempts to block railways

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मत चोरीप्रकरणी निवडणूक आयोगप्रमुख ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. १२) दुपारी रेल्वेस्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन केले. यावेळी नगरसोल - नरसापूर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत रेल्वे रवाना केली. आंदोलनामुळे रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मत चोरीच्या विरोधात सोमवारी इंडिया आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलनात सहभागी खासदारांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा विरोध विद्यार्थी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सुरुवातीला या कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकांवरच ठिय्या आंदोलन केले. याच दरम्यान दुपारी २ च्या सुमारास नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात आली. ती ३ मिनिटे थांबली याच दरम्यान कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या इंजिनसमोर जात रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला.

ताब्यात घेताच रेल्वे रवाना

काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक रेल्वेसमोर गेल्याने रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांची एकच धावपळ उडाली. त्यांनी तत्काळ सतर्क होत हातात फलक घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रेल्वे नरसापूरकडे रवाना केली. यावेळी पदाधिकारऱ्यांची घोषणाबाजी आणि पोलिसांच्या धरपकडीमुळे रेल्वेस्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT