Victim assaulted for reporting abuse
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : लग्राचे आमिष दाखवून महिलेवर आठ वर्षे नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. या अत्याचारातून ती महिला तीन वेळा गर्भवतीही राहिली. मुंबई भागातील एका महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भारत प्रभाकर राठोड (रा. परळी, बीड ह. मु. पनवेल) असे मुख्य आरोपीचे नाव असून, त्याला विशाल राठोड, राहुल अंबेसंगे (रा. उदगीर, लातूर) यांनी मदत केली होती.
याप्रकरणी गेल्या महिन्यातच मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुरुवारी रात्री पीडितेला संग्रामनगर उड्नु ाणपुलाजवळ तीन गुंडांनी गुन्हा मागे घे म्हणत अडवून हल्ला केला. तिला जबर मारहाण केली.
पीडिता ही गुरुवारी सायंकाळी आपल्या मैत्रिणीकडे जात होती. तेथे त्यांच्या दुचाकीसमोर संग्रामनगर उडाणपुला बाजूच्या सर्व्हिस रोडवर अचानक एक चारचाकी त्यांच्या वाहनासमोर आली. त्यातून तिघे खाली उतरले आणि त्यातील एकाने पीडितेची मान धरून पाठीत बुक्क्या मारल्या.
दुसऱ्याने हातातील धारदार कटरने पीडितेच्या उजव्या हातावर वार केला. वाचवण्याचा प्रयत्न केल्याने हाताला खरचटले. तुला भारत प्रभाकर राठोड आणि विशाल प्रभाकर राठोड, राहुल अंबेसंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू नको, असे बजावले, तरी तू गुन्हा दाखल केलास, आता हा गुन्हा मागे घेतला नाही तर तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली.
विशाल आणि राहुल लॅपटॉप, मोबाईल घ्यायला आले तेव्हा तुझ्यावर त्यांनी बलात्कार केला होता, असे मारहाण करणारे तिला म्हणत होते. परिसरातील लोक जमा झाले. त्यानंतर घटनेची माहिती पीडितेने डायल ११२ ला दिली. पोलिसांनी धाव घेऊन तिला ठाण्यात आणले.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडितेने पत्रकार परिषद घेऊन भारत राठोड मनपात अतिरिक्त आयुक्त असून, आर-ोपींपैकी एक जण एका मंत्र्यांचा स्वीय सहायक असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.