Sillod News : पोलिस उपनिरीक्षकांना धमकी, गळा पकडला

सिल्लोड : शहर पोलिस ठाण्यातील घटना, रस्त्यावर वाहन लावल्याने वाद
Sillod News
Sillod News : पोलिस उपनिरीक्षकांना धमकी, गळा पकडला File Photo
Published on
Updated on

Sillod Threat to police sub-inspector

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : महिला पोलिस अंमलदाराला खाली पाडून बेदम मारहाण करण्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच पुन्हा रस्त्यावर वाहन लावल्याच्या वादातून एकाने पोलिस निरीक्षकांना जिवे मारण्याची धमकी देत गळा पकडला. ही घटना शुक्रवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात दोन महिलांचा समावेश आहे.

Sillod News
Vetalwadi Dam : वेताळवाडी धरण भरल्याने सोयगावचा पाणीप्रश्न मिटला

गोकुळ कडुबा निकाळजे, उषा गोकुळ निकाळजे, कोमल गोकुळ निकाळजे व एक अल्पवयीन (रा. धावडा, ता. सिल्लोड, ह. मु. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर बाबू मुंढे असे जीवे मारण्याची धमकी देऊन गळा पकडलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे.

पोलिस उपनिरीक्षक बाबू मुंढे शहरातील नीलम चौकात कर्तव्य बजावत असताना वरील चार जण कारमधून आले. त्यांनी कार रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशी उभी केली. यामुळे मुंढे यांनी त्यांना कार बाजूला लावा, असे समाजावून सांगत असताना उषा निकाळजे, कोमल निकाळजे यांनी अर्वाच्य भाषेत अरेरावी केली. तुला वर्दीचा माज आला का ? तुझ्यावर अॅट्रॉसिटी करून माज जिरवू, असे म्हणत शिवीगाळ करून लोटलाट केली. यामुळे पोलिस उपनिरीक्षक मुंढे यांनी कार कारवाईसाठी ठाण्यात आणली.

Sillod News
Bail Pola : पोळा सणाच्या पूर्वसंध्येला बैलांची खांदेमळणी

पोलिस ठाण्यात अल्पवयीन आरोपीने शिवीगाळ केली. गोकुळ निकाळजेने जिवे मारण्याची धमकी देत थेट गळा पकडला, असे बाबू मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वरील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करीत आहेत. यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तीन दिवसांत दुसरी घटना

ठाण्यातच पोलिसांचा गळा पकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची ही तीन दिवसांत दुसरी घटना आहे. बुधवारी (दि.२०) सायंकाळी ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या तिघांनी थेट ठाणे प्रमुखांना अरेरावी करीत एका महिला पोलिस अंमलदाराचा गळा पकडून खाली पाडले व बेदम मारहाण केली. यात महिला पोलिस अंमलदार चक्कर येऊन खाली पडल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. तीन दिवसांत दुसरी घटना घडल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news