Vehicle Tracking System : सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होणार व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vehicle Tracking System : सप्टेंबरमध्ये कार्यान्वित होणार व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम

प्रवाशांना घरबसल्या मिळणार बसचे लोकेशन

पुढारी वृत्तसेवा

Vehicle tracking system to be operational in September

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात एसटी महामंडळाच्या सुमारे १५ हजार बसेस असून यापैकी १२ हजार बसेसना व्हीटीएस (व्हेईकल ट्रैकिंग सिस्टीम) बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, ही सेवा सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित होणार आहे. ही सेवा कार्यान्वित होताच बसच्या प्रवाशांना घरबसल्या कोणत्याही बसचे लोकेशन पाहता येणार असल्याची माहिती गुरुवारी (दि.२१) एसटी महामंडळाचे एमडी माधव कुसेकर यांनी दिली.

कुसेकर आढावा बैठकीसाठी शहरात आले होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक रिजनच्या विभाग नियंत्रकांची बैठक गुरुवारी घेतली. या बैठकीत बसची स्थिती आणि उत्पनांची माहिती घेतली, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. एसटी महामंडळ प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी काळानुरूप एसटी बसेसला अत्याधुनिक करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

याचाच एक भाग म्हणून सर्वच एसटी बसेला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यातील १५ हजार बसपैकी १२ हजार बसेसना ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. उर्वरित बसेसना ही यंत्रणा बसवण्याचे काम युद्धपातीळीवर सुरू आहे. ही यंत्रणा सप्टेंबर महिन्यांत कार्यान्वित होऊन प्रवाशांना घरबसल्या बसचे लोकेशन पाहता येणार आहे.

लवकरच अॅप उपलब्ध एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी बसचे अॅप लवकरच लॉन्व करण्यात येणार आहे. या अॅपमुळे बसचे लोकेशन, कोणती बस कोणत्या मार्गावर आहे, आणि ती किती वाजेपर्यंत आपल्यापर्यंत पोहचू शकते याची माहिती प्रवाशांनाही मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

आघडीला ही यंत्रणा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांपर्यंतच सुरू आहे. उर्वरित बसेसेना ही सिस्टीम बसवण्याचे काम पूर्ण होताच ही सेवा सर्वसामांन्यांना अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशीही माहिती कुसेकर यांनी दिली. वेळेचे नियोजन करणे सोपे अनेकदा काही कारणांमुळे बस वेळेवर सोडण्यात येत नाहीत. या यंत्रणेमुळे कोणती बस किती वाजता मार्गस्थ झाली याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे काही त्रुटी असतील तर त्या दूर करून गाड्या वेळेवर सोडण्याचे नियोजन करण्यात मदत मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT