वरठाण ः रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांची रांग लागली होती.  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Varthan Chowphuli protest : वरठाण चौफुली येथे तब्बल बारा तास रास्ता रोको आंदोलन

घटनेप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

वरठाण : सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील चौफुलीवर लावण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली होती. ही घटना रविवार (दि.12) रात्री दहा वाजता समाजबांधवांच्या लक्षात आल्यावर समाजबांधव वरठाण चौफुलीवर जमा झाले. राज्य रस्ता क्र.24 वर तब्बल बारा तास रास्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध केला.

सदरील घटनेबाबत बनोटी चौकीत रीतसर तक्रार देण्यात आली. रात्रीच्या मुक्कामी असलेल्या बसेस पाचोरा सिल्लोड, चाळीसगाव सोयगाव,हनुमंतखेडा पाचोरा आदी बस व इतर खासगी वाहने जागेवरच थांबलेली होती या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवारी (दि.13) सकाळी परिसरातील गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने वरठाण चौफुलीवर जमा होत आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याची मागणी करीत होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांनी कारवाईचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळी दहा वाजता रस्ता सुरळीत करण्यात आला.या घटनेप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोयगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन आरेकर, जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, नारायण खोडे आदी तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT