छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीने मनपाच्या पहिल्याच निवडणुकीत प्रभाग तीनमध्ये चमक दाखवत चार शिलेदार जिंकून आणले.
या प्रभागातील अनेक मुरब्बी उमेदवारांना पहिल्याच प्रयत्नात विरोधकांना घरचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वी अमित भुईगळ यांनी भारिपच्या वतीने निवडणूक लढवून मैदान मारले होते. त्याचबरोबर अफसर खान यांनी काँग््रेासकडून मैदान मारलेले होते. दरम्यान, दोन महिला उमेदवार या नवीन असूनही मैदान मारण्यात यशस्वी झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीची ही महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे.यात त्यांनी दमदार यश मिळविले.
या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीनचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित सुधाकर भुईगळ (अ), जरीना जावेद कुरेशी (ब), करुणा मेघानंद जाधव (क) आणि अफसर खान यासीन खान (ड) या चार उमेदवारांनी दिग्गजांना मागे सारत निवडणूक जिंकली. दरम्यान, या विजयानंतर कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साही वातावरण पहावयास मिळाले.