कौटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक मिळावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पंचायत समितीत वर्ग भरवला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur students protest : वैजापूरला गटविकास अधिकारी दालनाजवळ भरवला वर्ग

कौटगाव वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांसाठी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : तालुक्यातील लाख खंडाळा येथील कौटगाव वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. १८) अनोखे आंदोलन केले. इयत्ता पाहिली ते पाचवी वर्गातील जवळपास २५ विद्यार्थी व पालकांनी थेट पंचायत समिती गाठून तेथेच वर्ग भरवला. गट विकास अधिकारी ज्ञानदेव जायभाये यांनी विद्यार्थ्यांची दखल घेऊन तातडीने त्यांची भेट घेऊन म्हणणे ऐकून घेतले.

कौटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून दोन शिक्षक मंजुर आहेत. पण यातील एक शिक्षक हजर झाला असून ते वैद्यकीय रजेवर गेले आहेत तर दुसरे शिक्षक हजर झाले नसल्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात नेमण्यात आलेल्या एका शिक्षकावर शाळा सुरु आहे. त्याचा विपरित परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची नेमणूक न झाल्यास बिडिओच्या दालनात शाळा भरवू असे निवेदन शालेय व्यवस्थापान समितीची अध्यक्ष, सदस्य व पालकांनी प्रशासनाला दिले होते.

त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू निवृत्ती सोनवणे, पालक शरद शिलोटे, ज्ञानेश्वर देवकर, गोकुळ सोनवणे (लाख खंडाळा) आदींनी पंचायत समिती कार्यालयात दोन तास वर्ग भरवून घोषणा देऊन अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

दोन शिक्षक देण्याचे प्रशासनाचे आश्वासन

गटविकास अधिकारी जायभाये यांनी विद्यार्थी व पालक यांची भेट घेऊन लवकरच दोन शिक्षक शाळेत देण्याचे आश्वसन दिले तसेच अन्य एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती केली असल्याचे सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT