vadgaon murder
वडगाव - घटनास्थळी पाहणी करताना सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे. Pudhari
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : वडगाव येथे दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वडगाव येथील खदानीजवळ ३० वर्षीय तरुणाचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली. शैलेश विठ्ठल दौंड (३० रा. आर.एच. ३१, एफडीसी हौ.सो. बजाजनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश हा आई-वडील तसेच पत्नी सोबत बजाजनगर येथे राहत असे. त्याचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले असून तो वाळूज येथील एका नामांकित कंपनीत एच आर विभागात नोकरीला होता. काही दिवसापूर्वी कंपनीतील जॉब सोडल्याने तेव्हा पासून तो घरीच होता. तर शैलेशचे वडील एफडीसी कंपनीत कामाला असून त्याची आई घरीच असते.

गुरुवारी सकाळी वडगाव येथील जलकुंभालगत असलेल्या खदानीजवळून रस्त्यांनी जाणाऱ्या महिला कामगारांना रक्ताच्या थारोळ्यात एक जण बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अशोक इंगोले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्यांना वडगाव येथील गट नंबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शैलेश याचे डोके दगडाने ठेचलेले दिसले. त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यात फेकल्याचे दिसले.

घटनास्थळी पोलिसांना रक्ताने माखलेला दगड आणि एक सँडल, चप्पल तसेच दोन चाव्या मिळून आल्या. यावेळी पोलिसांनी श्वानाच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान पन्नास फूट अंतरावर घुटमळले. दरम्यान फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थवरून रक्ताचे नमुने घेतले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

ओळख पटविण्यात पोलिसांना यश

अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी बजाजनगर, वडगाव तसेच सिडको वाळूज महानगर परिसर पिंजून काढला. मयताचा फोटो तसेच मृताच्या उजव्या हातावर आई असे गोंदलेले होते. याचा आधार घेत पोलिस मयत तरुणाच्या वडिलांपर्यंत पोहोचले. त्यांना मृतदेह दाखविताच वडिलांनी मुलगा शैलेश याचाच मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शैलेश याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटी दवाखान्यात हलविला.

SCROLL FOR NEXT