Unknown vehicle hits two-wheeler, one killed, two seriously injured
कसाबखेडा, पुढारी वृत्तसेवा :
अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील ४ वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीर झाले आहे. ही घटना सोमवार दि. ३० रोजी सायंकाळी धुळे, सोलापूर महामागीवरील पोटुळ फाटा येथे घडली. उमर शेख (४) ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर शेख उस्मान शेख सुभान (३५), शमीना उस्मान शेख (३०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
धुळे, सोलापूर हायवे एमएच ५२ वरील पोटुळ फाटा येथे ३० जुन रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने मोटारसायकल क्र. (एम. एच. २० ए.व्ही. ३१९२) जोराची धडक दिली. मोटारसायकल स्वार रायपूर येथील शेख उस्मान शेख सुभान व शमीना उस्मान शेख वय ३० गंभीर जखमी झाले असून यांचा ४ वर्ष वयाचा मुलगा ऊमर शेख हा जागीच ठार झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की, चारचाकी वाहनधाच्या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला होता. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास शिल्लेगाव पोलिस करत आहे. महामार्ग पोलिस हेड कॉन्स्टेबल सोपान झाल्टे, शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
धुळे, सोलापूर महामार्गात अनेक छोटे, मोठे गावे लागतात. या वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर गावे असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची खूप गरज आहे. यामुळे अपघाताला अटकाव बसू शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.