Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची फसवणूक

कचरा संकलन कंपनीत सुपरवायझर पदासाठी प्रत्येकी उकळले १५ हजार; सभापती मकरिये यांनी दिले चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेशी संबंधित कंत्राटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या कंपनीत सुपरवायझर पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन देत काही व्यक्तींनी तरुणांकडून प्रत्येकी सुमारे १५ हजार रुपये उकळल्याची तक्रार करण्यात आली आहे.

दोन ते अडीच महिने उलटल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्रस्त तरुणांनी शुक्रवारी (दि. १९) स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची भेट घेतली. सभापतींनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

महापालिकेने शहरातील कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थापनाचे काम 'वेस्टर्न इमॅजिनरी' या गुजरातस्थित कंपनीकडे सोपविले आहे. या कंपनीत भरती सुरू असल्याची माहिती मिळताच काही भामट्यांनी महापालिकेत ओळख असल्याचा दावा करत बेरोजगार तरुणांशी संपर्क साधला. मार्च महिन्यात काही तरुणांनी या बदल्यात गुगल पे आणि फोन पे द्वारे पैसे पाठविले होते. सुरुवातीला १५ दिवसांत नियुक्ती पत्र देण्याचे आमिष दाखवून वेळ मारून नेण्यात आली; मात्र कोणतीही हालचाल न झाल्याने तरुणांना संशय आला.

ऑनलाईन पुरावे सादर

नोकरीच्या आशेवर एका तरुणाचे लग्न निश्चित झाले होते, मात्र नियुक्ती न मिळाल्याने आता वधू पक्षाकडून नाराजी व्यक्त होत असून लग्नाचा निर्णय अडचणीत सापडला आहे. आर्थिक नुकसानासोबतच वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाल्याची खंत संबंधित तरुणाने व्यक्त केली. तक्रारदारांनी ऑनलाईन व्यवहारांचे स्क्रीनशॉट आणि व्यवहार क्रमांकासह ठोस पुरावे सभापर्तीकडे सादर केले आहेत. अशा पद्धतीने ७ ते ८ तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

66 महापालकित नोकरी मळिवून देण्याचे आश्वासन देत तरुणांकडून पैसे घेतल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. तक्रारदारांनी ऑनलाईन व्यवहारांचे पुरावेही दलि आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे नरिदेश संबंधति अधकिाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अनिल मकरिये, सभापती, स्थायी समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT