अजिंठा घाटातील कोंडीत यूएन समन्वयक; पायी जाऊन पाहिली लेणी file photo
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा घाटातील कोंडीत यूएन समन्वयक; पायी जाऊन पाहिली लेणी

संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील निवासी समन्वयक स्टेफन प्रिस्नर यांनी शनिवारी अजिंठा लेणीला भेट दिली.

पुढारी वृत्तसेवा

UN Coordinator Caught in Ajanta Ghat Traffic Jam; Visited Caves on Foot

छत्रपती संभाजीनगर: संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील निवासी समन्वयक स्टेफन प्रिस्नर यांनी शनिवारी अजिंठा लेणीला भेट दिली. मात्र, अजिंठा घाटातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांचे वाहन पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी व्ह्यू पॉइंटवरून पायीच लेणीकडे प्रस्थान केले. या अनपेक्षित परिस्थितीतही त्यांनी भित्तिचित्रे व शिल्पकलेचा मनापासून आनंद घेत ऐतिहासिक वारशाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

व्ह्यू पॉइंट परिसरातील पायऱ्यांची अवस्था तसेच प्लास्टिक कचरा पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. गाइड डॉ. सुभाष जाधव यांनी त्यांना लेणींची सविस्तर माहिती दिली. यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधिकारी उपस्थित होते.

दौऱ्यात प्रिस्नर यांनी रस्त्यालगतच्या शेताला भेट देत करडी व आंब्याच्या पिकांची माहिती घेतली. तसेच बीबी का मकबरा पाहून वास्तुकलेचे कौतुक केले आणि हिमरू साडी खरेदी करत स्थानिक हस्तकलेलाही दाद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT