Uddhav Thackeray's visit to Marathwada from Wednesday
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते, मात्र हजारो शेतकयांच्या खात्यात अजूनही रक्कम पोहोचलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दगाबाज रे, या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे यांचा हा दौरा ५, ६, ७ व ८ नोव्हेंबर रोजी असणार आहे.
ठाकरे हे गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतील. चावडी, पारावर बसून शेतकऱ्यांकडून पॅकेज मिळाले किंवा नाही, सरकारची मदत मिळाली का याबद्दलची भूमिका जाणून घेतील. बुधवार, ५ नोव्हेबर रोजी उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथून दौऱ्याला प्रारंभकरतील. सकाळी १० वाजता पैठण तालुक्यातील नांदर गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
सकाळी ११.३० वाजता बीड तालुक्यातील पाली, दुपारी २ वाजता धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाश्रुड, दुपारी ३.३० वाजता परंडा तालुक्यातील शिरसाव, सायंकाळी ५ वाजता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी, सायंकाळी ७वाजता धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील व मुक्काम करतील.
गुरुवार, ६ रोजी सकाळी १० वाजता धाराशिव तालुक्यातील करंजखेडा, दुपारी १२ वाजता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसणी, दुपारी २ वाजता अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी, सांयकाळी ४ वाजता नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पार्डी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
सायंकाळी ७ वाजता भोकर येथील तलाव रिसॉट येथे नांदेड व हिंगोली जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मुक्काम करतील. शुक्रवार, ७ रोजी सकाळी १० वाजता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
त्यानंतर दुपारी १२ वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा, दुपारी २ वाजता औंढा तालुक्यातील जवळाबाजार, सायंकाळी ४ वाजता परभणी तालुक्यातील पिंगळी स्टेशन, सायंकाळी ७ वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृहात परभणी लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व मुक्काम.
शनिवार, ८ रोजी सकाळी १० वाजता परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, सकाळी ११.३० वाजता सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव, दुपारी २ वाजता जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा, सायंकाळी ४ वाजता घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ६ वाजता सुभेदारी विश्रामगृह येथे छत्रपती संभाजीनगर-जालना लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील व त्यानंतर सायंकाळी ७ वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.