Accident News : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला.

पुढारी वृत्तसेवा

Two-wheeler rider injured in collision with pickup truck

देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. १३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर चालकाने वाहनासह पलायन केले.

दुचाकीने श्एरमपी-१२-झेडजे-२१९१) रवी सोळंकी हा युवक जात होता. माऊली वजन काट्यासमोर भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून रवी सोळंकी हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तो वेदनेने विव्हळत रस्त्यावर पडून होता.

दरम्यान, अपघाताचे प्रत्यक्षदर्शी मनोज रावते यांनी प्रसंगावधान राखत रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना थांबवून जखमीला मदत करण्याचे आवाहन केले. मात्र, काही वाहने न थांबता पुढे निघून गेल्याने मदत मिळण्यास विलंब होत होता. यांनी रुग्णकल्याण समिती सदस्य सतीश करडे यांच्याशी संपर्क साधला.

सतीश करडे यांनी १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क केला. चौकशीत रवी सोळंकी हा सिद्धीनाथ वाडगाव येथे विहीर बांधकामाचे काम करणारा मजूर असून तो मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याच्या ठेकेदारालाही घटनेची माहिती देण्यात आली. १०८ रुग्णवाहिकेतील डॉ. कोळेकर, चालक संपत नाईक तसेच उपस्थितांनी युवकाला रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT