Two trains going to Mumbai canceled today due to waterlogging on the tracks trains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने गुरुवारी (दि.२१) मुंबईला जाणारी वंदेभारत व नंदीग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथून सुटणारी गाडी संख्या २०७०५ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत जाणारी वंदेभारत ही गाडी व बल्हारशाह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणारी गाडी क्रमांक ११००२ नंदीग्राम एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गुरुवारी रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे कामानिमित्त किंवा वैद्यकीय कारणांनी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बस व इतर खासगी वाहनांकडे प्रवाशांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गाड्यांची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व हेल्पलाईन क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे अधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्नशील असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.