Sambhajinagar News : चाकूचा धाक दाखवून कामगारास लुटणारे दोन भामटे गजाआड  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : चाकूचा धाक दाखवून कामगारास लुटणारे दोन भामटे गजाआड

चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपेवरून ८ हजार ५० रुपये ट्रान्जेक्शन करून त्यास लुटणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

Two thugs robbed a worker at knifepoint, arrested

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपेवरून ८ हजार ५० रुपये ट्रान्जेक्शन करून त्यास लुटणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. कृष्णा भास्कर चक्रे (३०) व गजानन फकिरा जाधव (३२, दोघे रा. ओमसाईनगर, कमळापूर रांजणगाव) असे अटक केलेल्या या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळून एक दुचाकी, धारदार चाकू, मोबाईल तसेच रोख ४ हजार असा ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या विषयी पोलिसांनी सांगितले की, रमेश शिवलाल राठोड (३२, रा. जो गेशवाडी, जामखेड ह.मु. बजाजनगर) हा वाळूज औद्योगिक क्षेत्रात काम करतो. रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास तो कोलगेट चौकातून घराकडे जात होता. यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून रमेशचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच त्याच्या फोन पेचा पासवर्ड विचारून त्याच्या खात्यावरील ८ हजार ५० रुपये त्यांच्या फोनपेवर वळती करून घेतले व त्यास जिवे मारण्याची धमकी देऊन दोघे तेथून पसार झाले होते.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर व त्यांच्या पथकातील अमलदारांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून कृष्णा चक्रे व गजानन जाधव या दोघांना बिकेटी कंपनीजवळ ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याजवळून (एमएच १९, एयू-२१६५) या क्रमांकाची चोरीची दुचाकी, एक धारदार चाकू, मोबाईल व रोख ४ हजार रुपये असा जवळपास ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींवर वेगवेगळ्या ठाण्यात गुन्हे

या आरोपींविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ६, वेदांतनगर व छावणी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT