Sambhajinagar Crime News : दोन विद्यार्थ्यांच्या पाठीत चाकू खुपसून मारहाण, क्लासेससमोरच दहावीचे विद्यार्थी भिडले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : दोन विद्यार्थ्यांच्या पाठीत चाकू खुपसून मारहाण, क्लासेससमोरच दहावीचे विद्यार्थी भिडले

शहरात चाकू, तलवार शस्त्र आता लहान मुलांचे खेळणे बनले आहे की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Two students stabbed in the back and beaten Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

शहरात चाकू, तलवार शस्त्र आता लहान मुलांचे खेळणे बनले आहे की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. पुंडलिकनगर येथील एका क्लासेससमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या चौघांसह इतरांनी दोन विद्यार्थ्यांवर हल्ला चढवत पाठीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. फायटरने डोक्यात मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १४) रात्री पावणे आठच्या सुमारास समर्थ कोचिंग क्लासेससमोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

१६ वर्षीय फिर्यादी हा पुंडलिकनगर भागातील रहिवाशी आहे. तो इयत्तात्त दहावीत शिकतो. त्याच्या मित्रांचे दोन दिवसांपूर्वी आरोपी चार जणांसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून दोघांना त्या चौघांनी समर्थ कोचिंग क्लासेससमोर गाठले. फिर्यादीच्या डोक्यात फायटरने मारून जखमी केले. अन्य आरोपींनी उजव्या बाजूला पाठीत चाकू खुपसला. तसेच त्याच्या मित्राच्या देखील पाठीत चाकू खुपसून दोघांना जखमी केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील म्हस्के करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT