प्रोझोन मॉलमध्ये दोन दुकाने फोडली File Photo
छत्रपती संभाजीनगर

प्रोझोन मॉलमध्ये दोन दुकाने फोडली

शहरातील प्रोझोन मॉलमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Two shops were broken into at Prozone Mall

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रोझोन मॉलमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. मॉल मधील दोन नामांकित दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून चोरट्यांनी ६ लाख ६६ हजार २९९ रुपयांची रोख रक्कम, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले. ही घटना २६ जानेवारीच्या रात्री सव्वाअकरा ते २७ जानेवारीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते.

अधिक माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त असताना चोरट्यांनी मॉलला लक्ष्य केले. मॉलच्या तळमजल्यावरील स्केचर्स या शोरूमचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथून ३ लाख ७५ हजार ५०६ रुपयांची रोकड, ब्रँडेड चप्पल, टी-शर्ट, स्पोर्ट्स पॅन्ट आणि हुडी असा सुमारे २९ हजार २९३ रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील दुसऱ्या एका दुकानाकडे वळवला.

येथील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ३८ हजार ५०० रुपयांची रोकड, २० हजार रुपयांचा लॅपटॉप आणि हेअर ड्रायर असा मुद्देमाल लंपास केला. एवढ्या मोठ्या मॉलमध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांनी तीन-चार तास धुमाकूळ घातला. यामुळे मॉलच्या अंतर्गत सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुकान व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT