Nylon Manja : नायलॉन मांजा खरेदी, विक्रीप्रकरणी दोघांना अटक File Photo
छत्रपती संभाजीनगर

Nylon Manja : नायलॉन मांजा खरेदी, विक्रीप्रकरणी दोघांना अटक

मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व चायनीज मांजाच्या विक्री विरोधात शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Two people have been arrested in connection with the purchase and sale of nylon kite manja

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व चायनीज मांजाच्या विक्री विरोधात शहर पोलिसांनी कडक पावले उचलली असून, सिटीचौक आणि मुकुंदवाडी परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करुन दोन जणांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत नायलॉन मांजाचे एकूण ५१ गट्टू जप्त करण्यात आले आहे.

शेख आमेर शेख चांद (२५, रा. प्रबुद्ध नगर) आणि आलमईन खान नईम खान (रा. मुज्जफरनगर, हर्मूल) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम हे पथकासह शहरात गस्त घालत असताना त्यांना सिटीचौक परिसरातील बारुदगर नाक्याजवळील एका घरात नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शेख आमेर हा नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करताना आढळून आला.

त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे नायलॉन मांज्याचे ४० गट्टू जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आमेर याने हा मांजा रमान ऊर्फ सोनू याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

मुकुंदवाडीतही कारवाई

दुसरी कारवाई ही मुकुंदवाडी परिसरात करण्यात आली. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल नायलॉन मांजाच्या अन्य एका गुन्ह्यात आलमईन खान याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून ८ हजार ८०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ११ गट्टू जप्त करण्यात आले आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT