उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली, दोन ठार file photo
छत्रपती संभाजीनगर

उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली, दोन ठार

सिल्लोड तालुक्यातील चिंचखेड्याजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

Two killed as bike hits stationary truck

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

हॉटेलजवळ उभ्या ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकून झालेल्या अपघात दोनजण जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी (दि. २३) रात्री अकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचखेडा गावालगत असलेल्या हॉटेल प्रीतीजवळ घडला. या घटनेचा वडोदबाजार पोलिसांनी पंचनामा केला आहे.

कैलास सखाराम मगर (४०) संजय बारकुबा खटाळ (४०, दोघे रा. निल्लोड, ता. सिल्ल-ोड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कैलास मगर माणिकनगरज-वळील हॉटेल गुरुवर मॅनेजर तर संजय खटाळ वेटर म्हणून कामाला होते. हॉटेल व गावाचे अंतर ५ किमी असल्याने दोघे दररोज दुचाकीवरून ये जा करीत होते.

सोमवारी रात्री हॉटेल बंद करून दोघे नेहमीप्रमाणे दुचाकीवरून (एम एच २०, एफ एच - १४१३) गावी निल्लोडकडे जात होते. या दरम्यान चिंचखेडा गावाज कैलास मगर संजय खटाळ वळील हॉटेल प्रीतीजवळ सिमेंट पाईपने भरलेला ट्रक (एम एच- १४, सी ४९४५) उभा होता. या उभ्या ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.

या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करीत आहे. दरम्यान मृतांवर मंगळवारी दुपारी एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास मगर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मलगी, तर संजय खटाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अपघातात घरातील कमावते गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर को-सळला आहे.

रस्त्यावर रक्ताचा सडा

या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. डोक्याला जबर मार लागल्याने दोघे जागीच ठार झाले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. हा अपघात कामावर असलेल्या हॉटेलपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर घडला. तर निल्लोडगाव अवघे ३ कि.मी. राहिले होते. मात्र नियतीने मध्येच डाव साधला व अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सरपंच, उपसरपंच धावले मदतीला

सदर अपघाताची माहिती मिळताच निल्लोडचे उपसरपंच अक्षय मगर, चिंचखेड्याचे सरपंच ईश्वर गव्हाणे, माजी उपसरपंच विलास फरकाडे तातडीने मदतीला धावले व नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेतील दोघांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळतात रात्रीच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT