E-Double Decker Buse : नववर्षात धावणार दोन ई डबलडेकर बस  File Photo
छत्रपती संभाजीनगर

E-Double Decker Buse : नववर्षात धावणार दोन ई डबलडेकर बस

मनपाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात, कंपनीसोबत अटीशर्तीवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Two e-double-decker buses will run in the New Year

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने दोन (ओपन टू स्काय) ई-डबल डेकर बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, देशात या ओपन ई डबल डेकर बसचे उत्पादन एकही कंपनी घेत नाही. त्यामुळे महापालिका युनायटेड किंगडमच्या (युके) स्वीस कंपनीची बस खरेदी करणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून अटीशर्तीवर अंतिम चर्चा सुरू आहे. त्यामुळे नववर्षात शहरवासियांना पर्यटनासाठी डबलडेकर बस मिळणार आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्या, दैलताबाद किल्ल्यासह ताज महालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा आणि पाणचक्की, बुद्ध लेणी असलेले ५२ दरव-ाजांचे शहर अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख जगभरात आहे. शहरातील या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी दरवर्षी देशातूनच नव्हे तर विदेशातून हजारो पर्यटक येतात. यासोबतच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे घृष्णेश्वर मंदिर, म्हैसमाळ साखरे हिल स्टेशन देखील छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे. त्यामुळे धार्मिकस्तरावरही जिल्ह्याला मोठे महत्त्व आहे.

ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठी एसटी महामंडळ आणि स्मार्टसिटी बस आहेत. परंतु, पर्यटकांना आणखी अकर्षित करण्यासाठी महापालिकेने जर्मनीतील फ्रैंकफर्ट शहराप्रमाणे ओपन डबलडेकर बस घेण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला होता. त्यासाठी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबविली होती.

सोलापूर येथील चव्हाण ऑटो व्हिल्स या एजन्सीला या बसेस - तयार करण्याचे काम दिले होते. परंतु, आरटीओ पासिंगमध्ये अडथळे येत असल्याने डिझेलऐवजी ई डबलडेकर बस घेण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. त्यानुसार ई बस तयार करणाऱ्या कंपनींचा शोध घेण्यात आला. देशात एकही कंपनी ई ओपन डबलडेकर बसचे उत्पादन घेत नाही. केवळ युनायटेड किंगडमची (युके) स्वीच कंपनीच हे उत्पादन घेते. या कंपनीशी अशोक लेलँडचा करार आहे. त्यामुळे या कंपनीकडून बस बांधणी करून घेण्यात येणार आहे.

केवळ अटीशर्तीवर चर्चा

निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. केवळ देखभाल दुरुस्तीच्या कालावधीच्या अटीशर्तीवर चर्चा सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच लागलीच बसची ऑर्डर दिली जाणार आहे. त्यानंतर नववर्षात शहराला दोन ओपन डबलडेकर बस मिळणार आहेत.

लवकरच मार्ग ठरणार

महापालिकेने जर्मनीतील फ्रैंकफर्ट शहराप्रमाणे ओपन डबलडेकर बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन ई डबलडेकर बस खरेदी करणार आहे. या बसेस कोणत्या पर्यटनस्थळांना भेटी देतील हा मार्ग लवकरच ठरणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT